ETV Bharat / sports

VIDEO : रोहित शर्मा नहीं 'ग्रेट रोहित शर्मा', पाकचा माजी वेगवान गोलंदाज हिटमॅनच्या प्रेमात - rohit sharma RECORD

शोएब अख्तरला २०१३ सालीच रोहित शर्माच्या प्रतिभेची चाहूल मिळाली होती. त्यामुळे त्याने २०१३ मध्ये रोहितला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

VIDEO : रोहित शर्मा नही 'ग्रेट रोहित शर्मा', पाकचा माजी वेगवान गोलंदाज हिटमॅनच्या प्रेमात
author img

By

Published : Oct 3, 2019, 6:36 PM IST

Updated : Oct 3, 2019, 7:16 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय सलामीवीर रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केले आहे. कसोटीत प्रथमच सलामीला उतरत रोहितने २२४ चेंडूत १७६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीवर शोएब 'फिदा' झाला आहे.

शोएब अख्तरला २०१३ सालीच रोहित शर्माच्या प्रतिभेची चाहूल मिळाली होती. त्यामुळे त्याने २०१३ मध्ये रोहितला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

हेही वाचा - कसोटी : सलामीवीर म्हणून शतकी ठोकणारा रोहित चौथा; १, २, ३ कोण आहेत वाचा...

काय घडलं होत 'त्या' दिवशी -
२०१३ साली बांगलादेशमध्ये शोएब अख्तरने रोहित शर्माला 'तुझे काय नाव आहे' विचारले. तेव्हा रोहितने 'भाऊ, माझे नाव तुला माहीत आहे' असे सांगून, मी रोहित शर्मा असे उत्तर दिले. त्यावर शोएबने त्याला तुझ्या नावापुढे 'जी' हे अक्षर लाव असा सल्ला दिला. 'जी' चा अर्थ शोएबने सांगितला. तो म्हणतो, रोहित शर्मा नाही तर 'ग्रेट रोहित शर्मा.' भारतामध्ये तुझ्यासारखा फलंदाज पुन्हा होणार नाही, असेही शोएब त्यावेळी म्हणाला होता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शोएब अख्तरने आपला युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तो रोहितचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे.

हेही वाचा - India Vs South Africa : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला..भारताची सामन्यावर पकड, आफ्रिका ३ बाद ३९

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.