हैदराबाद - भारतीय संघाचा 'गब्बर' खेळाडू शिखर धवन दुखापतीतून सावरला आहे. सध्या तो दिल्लीच्या संघाकडून रणजी करंडक खेळत आहे. शिखरला दरम्यानच्या काळात सामना का खेळला नाही, अशी विचारणा करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिखरला लाथाबुक्या इतर कोणी नाही, तर त्याच्या मुलानेच मारल्या आहेत.
शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात शिखरला मुलगा झोरावर इतक्या दिवस सामना न खेळल्याबद्दल जाब विचारत आहे. झोरावर शिखरला लाथाबुक्यांनी मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी झोरावर शिखरची माफी मागतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
महत्वाचे म्हणजे, यावेळी शिखरची पत्नी आयेशाही तिथं उपस्थित होती. झोरावर जेव्हा शिखरची माफी मागतो. तेव्हा आई आयेशाचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते, 'हा माझा मुलगा आहे.'
शिखरने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले की, 'माझे मुख्य प्रशिक्षक मला मैदानावर खेळण्यासाठी नेहमी प्रेरित करत असतात. गब्बरला फक्त छोटा गब्बर मारू शकतो. झोरावर आणि माझी पत्नी सुट्टीवर भारतात आले आहेत. मी माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालविण्यास खूप उत्सुक आहे.'
दरम्यान, शिखरला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो सध्या दुखापतीतून सावरला असून रणजी करंडक स्पर्धा खेळत आहे. या सामन्यानंतर शिखर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात सामील होईल.
हेही वाचा - Boxing Day Test : ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २५७, स्मिथ नाबाद
हेही वाचा - पाकच्या 'पंग्या'वर भारताचा दंगा, बीसीसीआयने घेतला 'हा' निर्णय