सिडनी - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाची नवीन जर्सी समोर आणली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ ही जर्सी परिधान करेल. धवनने ट्विटरवर आपला फोटो शेअर केला. "नवीन जर्सी, नवीन उत्साह, आम्ही तयार आहोत", असे धवनने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
-
New jersey, renewed motivation. Ready to go. 🇮🇳 pic.twitter.com/gKG9gS78th
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">New jersey, renewed motivation. Ready to go. 🇮🇳 pic.twitter.com/gKG9gS78th
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2020New jersey, renewed motivation. Ready to go. 🇮🇳 pic.twitter.com/gKG9gS78th
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 24, 2020
९०च्या दशकात भारतीय संघाने अशा समान रंगाची जर्सी परिधान केली होती. टीम इंडियाला नुकताच एक नवीन प्रायोजक मिळाला आहे. टीम इंडियाचा प्रायोजक आता ऑनलाइन गेम कंपनी एमपीएल असून या कंपनीचा लोगो जर्सीवर आहे. बीसीसीआयबरोबर एमपीएलचा तीन वर्षांचा करार आहे.
मालिकेचे वेळापत्रक -
२७ नोव्हेंबर रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा हा पहिला सामना असेल. एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २९ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, तर तिसरा सामना २ डिसेंबरला होईल. त्यानंतर टी-२० मालिकेला सुरुवात होईल.
तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ४ डिसेंबर रोजी खेळला जाईल, तर दुसरा सामना ६ डिसेंबरला होईल. त्यानंतर या मालिकेचा अंतिम सामना ८ डिसेंबरला होईल.