ETV Bharat / sports

माझ्या शतकापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा - शिखर धवन - Indian Premier League

कॅपीटल्सकडून सलामी फलंदाज शिखर धवनची नाबाद ९७ धावांची खेळी

शिखर धवन
author img

By

Published : Apr 13, 2019, 4:50 PM IST

कोलकाता - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) काल ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने कोलकातावर ७ गडी राखून विजय मिळवला. कॅपीटल्सकडून सलामी फलंदाज शिखर धवनने शानदार नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

या सामन्यात धवनचे आयपीएलमधील पहिलं वहिलं शतक केवळ ३ धावांनी हुकले. सामना संपल्यानंतर हुकलेल्या शतकावर बोलताना धवन म्हणाला की, 'मला माहित होते की, मी आयपीएलमधील माझे पहिले शतक झळकावणार होतो. परंतु, त्यावेळी माझ्या शतकापेक्षा संघाचा विजय हा अधिक महत्त्वाचा होता. त्यामुळे मी कोणताही मोठा धोका घेण्यापेक्षा एक धाव घेणे महत्त्वाचे समजले.'

या विजयामुळे दिल्लीच्या खात्यात ८ गुण जमा झाले असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहचले आहेत.

Intro:Body:

sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.