लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तब्बल तीन आठवड्यांसाठी भारतीय संघातून बाहेर पडला आहे.
लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने ३६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात शिखर धवनने 109 चेंडूत 117 धावाची शानदार शतकी खेळी केली होती. या सामन्यादरम्यान शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आता विश्वकरंडक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
शिखरला झालेल्या या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता. त्याच्याजागी पूर्ण डावात रविंद्र जडेजाने क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली होती.
विश्वकरंडकात भारतीय संघाचा पुढील सामना 13 जूनला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात शिखरच्याजागी आता कोणत्या खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळते हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.