अबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्सने आम्हाला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही, असी कबुली दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामना संपल्यानंतर दिली. कोलकाताने दिल्लीवर ५९ धावांची विजय साकारला. या सामन्यानंतर श्रेयस बोलत होता.
श्रेयस अय्यर म्हणाला, सामन्याच्या सुरूवातीपासून आम्हाला कोलकातावर दबाब निर्माण करायला हवा होता. आमच्या गोलंदाजांनी तो केलासुद्धा. पण सुनिल नरेनने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते कौतूकास्पद आहे. त्याने आमच्या गोलंदाजाविरुद्ध शानदार कामगिरी नोंदवली. त्याच्या फटक्याची निवड योग्य होती. कोलकाताने प्रत्येक आघाडीतून आम्हाला बाहेर केले.
कोलकाताने १९५ धावाचे आव्हान आम्हाला दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना आम्हाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण पॉवर प्लेमध्येच आम्ही दोन महत्वाचे गडी गमावले. यामुळे दबाव वाढत गेल्याचेही, अय्यरने सांगितले.
दरम्यान, वरूण चक्रवर्तीची फिरकी आणि पॅट कमिन्सच्या वेगवान माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी लोटांगण घातले आणि कोलकाताने दिल्लीवर ५९ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १३५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. चक्रवर्ती ५ तर कमिन्सने ३ गडी बाद करत दिल्लीची फलंदाजी कापून टाकली. या विजयासह केकेआरने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखल्यामुळे आता यापुढील संघांमध्ये रंगणारे सामने अधिक रंगतदार होणार आहेत.
हेही वाचा - अर्धशतकानंतर राणानं दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी...जाणून घ्या कारण
हेही वाचा - KKR vs DC : चक्रवर्ती-कमिन्सच्या माऱ्यासमोर दिल्ली नेस्तनाबूत, कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान कायम