मुंबई - बांगलादेशमध्ये ४८ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून बांगलादेश लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रोजंदारीवर घर चालवणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबांच्या मदतीसाठी जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू साकिब अल हसन सरसावला आहे.
बांगलादेशी साकिब सद्या अमेरिकेमध्ये असून तो एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी आयसोलेट झाला आहे. त्याचे कुटुंबीय अमेरिकेत आहेत, परंतु शकिब एका हॉटेलमध्ये थांबला आहे. एकाच देशात असूनही आपल्या कुटुंबीयांना भेटता येत नसल्याचे दुःख त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन व्यक्त केले होते.
बांगलादेशमध्ये कोरोनाचे ४८ रुग्ण आढळले आहे. यामुळे बांगलादेशच्या सरकारने लॉकडाऊचा निर्णय घेतला. तेव्हा रोजंदारीवर घर चालवणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. यावर ३३ वर्षीय शकिबने बांगलादेशमधील काही गरीब कुटुंबीयांची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शकिब अल हसन फाऊंडेशनने 'Save Bangladesh' ही मोहीम सुरू केली आहे. याची माहिती त्याने फेसबुकवरून दिली.
- — Shakib Al Hasan (@Sah75official) March 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Shakib Al Hasan (@Sah75official) March 21, 2020
">— Shakib Al Hasan (@Sah75official) March 21, 2020
साकिबच्या फाऊंडेशनची आतापर्यंत २०० कुटुंबीयांपर्यंत मदत पोहोचली आहे. त्यांनी २००० कुटुबांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. या समाजकार्यासाठी ते जगभरातून निधीही गोळा करत आहेत.
दरम्यान, साकिब व्यतिरिक्त बांगलादेशच्या २७ खेळाडूंनी त्यांचा निम्मा पगार बांगलादेश सरकारला दिला आहे. मशरफे मोर्ताझानेही बांगलादेशमधील ३०० गरीब कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे.
हेही वाचा - कोरोना : ऑस्ट्रेलिया 'बॉर्डर' बंद, टी-२० विश्वकरंडकासह भारताचा दौरा अडचणीत
हेही वाचा - क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे होणार पुर्नप्रक्षेपण