ETV Bharat / sports

धोनीबद्दलच्या 'त्या' घटनेवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया - afridi reaction on dhoni's daughter threats

धोनीच्या ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी एका माथेफिरू चाहत्याने दिली. या घटनेवर शाहिद आफ्रिदीने भाष्य केले आहे.

Shahid afridi reacts to ms dhoni's daughter getting rape threats
धोनीबद्दलच्या 'त्या' घटनेवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया
author img

By

Published : Oct 12, 2020, 5:03 PM IST

दुबई - चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी एका माथेफिरू चाहत्याने दिली. या घटनेनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिली. आता यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भाष्य केले आहे.

आफ्रिदीने एका ट्विटद्वारे या घटनेचा निषेध केला. तो म्हणाला, ''धोनी आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल नक्की काय घडले हे मला माहिती नाही. पण जो काही प्रकार घडला ते खूपच चुकीचा आणि अयोग्य आहे. असे व्हायला नको होते. भारतीय क्रिकेटचे जागतिक स्तरावर नाव उंचावण्यात धोनीचा सिंहाचा वाटा आहे. त्याने नवखे आणि अनुभवी अशा सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन आपला क्रिकेटचा प्रवास केला. त्यामुळे धोनीच्या बाबतीत असे होणे बरोबर नाही.''

  • Shahid Afridi "I don't know what sort of threats were directed at MS Dhoni & his family but it's not right & shouldn't happen. Dhoni's the person who has taken Indian cricket to new heights. He's taken junior & senior players along this journey & doesn't deserve such treatment"

    — Saj Sadiq (@Saj_PakPassion) October 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण -

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना गमावला. यानंतर एका युजरने धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी दिली. या धमकी देणाऱ्या मेसेजवर अनेकांनी तीव्र शब्दात टीका केली होती. दरम्यान, या प्रकरणात एका संशयित आरोपीला पोलिसांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून अटक केली. लवकरच कच्छ पोलीस आरोपीला रांची पोलिसांकडे सुपुर्द करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कच्छ पोलिसांनी अटक केलेला आरोपी अल्पवयीन आहे.या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर धोनीच्या रांचीमधील निवासस्थाना बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.