कराची - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर आधारीत 'गेम चेंजर' ही आत्मकथा बाजारात ३० एप्रिलला येणार आहे. ही आत्मकथा प्रसिध्द वृत्तनिवेदक वजाहत एस खान यांनी लिहिली आहे. त्यांनी या आत्मकथेत आफ्रिदीशी संबधित सर्व घटना आणि वादांचा समावेश केला आहे.
ही आत्मकथा बाजारात येण्यापूर्वी आफ्रिदीने त्याच्या चाहत्यांना वचन दिले आहे, की या आत्मकथेमधील ज्या घटना लिहिल्या आहेत त्याचा खुलासा करण्यास तो मागे हटणार नाही. तसेच त्याने यात त्याच्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटनाचा उल्लेख केल्याचे सांगितले.
पाकिस्तानच्या ३९ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने २०१६ मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने २० वर्षाच्या करिअरमध्ये २७ कसोटी, ३९८ एकदिवसीय सामने आणि ९९ टी२० सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. काही दिवसांपूर्वी तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत होता.