ETV Bharat / sports

शेफाली वर्मा: मुलगी असल्याने अकॅडमीत प्रवेश नाकारला, मुलासारखी वेशभूषा करुन घेतले प्रशिक्षण - १५ वर्षीय महिला क्रिकेटर

शेफालीच्या वडिलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी सांगितलं की,  'शेफाली ही मुलगी असल्याने हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सर्व क्रिकेट अकॅडमीमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला. पण क्रिकेट खेळायचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शेफालीने मुलासारखी वेशभूषा करून प्रशिक्षण घेतले.'

शेफाली वर्मा: मुलगी असल्याने अकॅडमीत प्रवेश नाकारला, मुलासारखी वेशभूषा करुन घेतले प्रशिक्षण
author img

By

Published : Oct 3, 2019, 5:32 PM IST

नवी दिल्ली - भारतीय महिला क्रिकेट संघाने, मंगळवारी झालेल्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयात १५ वर्षीय शेफाली वर्माने ३३ चेंडूत ४६ धावांची खेळी करत मोलाची भूमिका बजावली. शेफाली ही मूळची हरियाणाची असून तिला क्रिकेटसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे, समोर आले आहे. शेफालीच्या वडिलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली असून, त्यात त्यांनी शेफाली ही मुलगी असल्याने, तिला क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला, असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

शेफालीच्या वडिलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, 'शेफाली ही मुलगी असल्याने हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सर्व क्रिकेट अकॅडमीमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला. पण क्रिकेट खेळायचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शेफालीने मुलासारखी वेशभूषा करून प्रशिक्षण घेतले.'

Shafali Verma, MIndias 15-year-old star, needed boys haircut to start cricket training
शेफाली वर्मा फलंदाजी करताना...

हेही वाचा - महिला टी-२० : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ५१ धावांनी विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी

'रोहतकमध्ये मुलींसाठी एकही अकॅडमी नव्हती. पण मुलांसाठी असलेल्या अकॅडमीमध्ये शेफालीला प्रवेश मिळावा म्हणून, मी विनवणी केली, हात जोडले. मात्र, याचा काही फायदा झाला नाही. तेव्हा मुलीचे केस कापून तिला एका अकॅडमीत घेऊन गेलो आणि मुलाप्रमाणे प्रवेश घेतला', असा शब्दात शेफालीच्या वडिलांनी त्या कटू आठवणी सांगितल्या. भारतीय संघात स्थान मिळेपर्यंत शेफालीचा प्रवास सहज नव्हता. या काळात अनेक गोष्टींना तिला तोंड द्यावे लागले.

शेफाली वर्मा भारतीय महिला क्रिकेट संघाची नवी खेळाडू...

क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर शेजारी आणि नातेवाईकांनी 'तुमची मुलगी मुलांसोबत खेळते,' असे बोलायला सुरूवात केली. अनेक वेळा मुलांच्या संघातून खेळताना तिला दुखापत झाली. तरीही तिने न डगमगता क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. असेही शेफालीच्या वडिलांनी सांगितले.

हेही वाचा - IND VS SA : रोहित-मयांकची जोडी जमली रे.., सेहवाग-गंभीरचा १५ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.