नवी दिल्ली - भारताची युवा महिला क्रिकेटपटू म्हणून नावारुपास आलेली शफाली वर्माने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी शफालीने सर्वात युवा भारतीय महिला होण्याचा मान मिळवला आहे.
-
What a moment this is for the hard-hitting batter Shafali Verma, who makes her India debut today. She is only 15! 😊💪🏾#INDWvsSAW pic.twitter.com/nD0C6ApQld
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What a moment this is for the hard-hitting batter Shafali Verma, who makes her India debut today. She is only 15! 😊💪🏾#INDWvsSAW pic.twitter.com/nD0C6ApQld
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2019What a moment this is for the hard-hitting batter Shafali Verma, who makes her India debut today. She is only 15! 😊💪🏾#INDWvsSAW pic.twitter.com/nD0C6ApQld
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2019
हेही वाचा - मराठमोळ्या 'स्मृती'चा विक्रम; विराट, रोहित, धोनीसारखे दिग्गजही करू शकले नाहीत 'असा' विक्रम
१५ वर्षीय शफालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले. मात्र, या सामन्यात तिला धावांचे खातेही उघडता आले नाही. जागतिक स्तरावरील टी-२० क्रिकेटमध्ये गार्गी बॅनर्जीने युवा महिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता.
गार्गीनंतर शफालीने या विक्रमात स्थान पटकावले आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये शफालीने चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे तिला भारतीय संघात स्थान दिले आहे. तिने सहा शतके आणि तीन अर्धशतकांसह १९२३ धावा केल्या आहेत.शफालीने महिला टी-२० चॅलेंजर स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती. या स्पर्धेत तिने नागालँडविरुध्द ५६ चेंडूत १२८ धावा चोपल्या होत्या. तिचे वय आणि कामगिरी पाहता भारतीय संघात पदार्पण हा शफालीसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.