दिल्ली - पहिल्या डावात अवघ्या ४४ धावांत सर्वबाद झालेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही सुमार खेळ करत डावाने पराभव होण्याची नामुष्की ओढवून घेतली. सर्विसेस विरूद्ध रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्राने दुसऱ्या डावात सर्वबाद १४७ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीच्या पलाम ए स्टेडियमवर दिल्लीने महाराष्ट्राचा सुफडा साफ करत एक डाव आणि ९४ धावांनी विजय नोंदवला. सर्विसेसच्या सचिदानंद पांडेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पांडेने गोलंदाजीत चमक दाखवत पहिल्या डावात तीन तर, दुसऱ्या डावात पाच गडी बाद केले.
हेही वाचा - अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉईनिसला साडे पाच लाखांचा दंड!
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना महाराष्ट्राचा भरवशाचा फलंदाज शून्यावर बाद झाला. त्याच्याव्यतिरिक्त अंकित बावणे आणि सत्यजित बच्छाव हे फलंदाजही खाते न उघडताच माघारी परतले. नौशाद शेखच्या ४१ आणि विशांत मोरेच्या ३६ धावांमुळे महाराष्ट्राला दीडशे धावसंख्येच्या जवळ पोहोचता आले. सचिदानंद पांडेने ५६ तर, दिवेश पठानियाने ४९ धावा मोजताना पाच बळी घेतले.
रवी चौहानच्या ६५, रजत पलिवालच्या ४२, विकास हाथवाला आणि अर्जुन शर्माच्या ४७ धावांच्या जोरावर सर्विसेसने पहिल्या डावात २८५ धावा केल्या. महाराष्ट्राकडून मनोज इंगळेने सर्वाधिक पाच, अनुपम संकलेचा आणि सत्यजित बच्छावने दोन आणि मुकेश चौधरीने १ बळी घेतला.