ETV Bharat / sports

स्कॉटलंडच्या 'या' खेळाडूने ६ चेंडूत ठोकले ६ षटकार; २५ चेंडूत विक्रमी शतक - undefined

जॉर्ज मुन्सी नावाच्या या फलंदाजाने आपल्या वादळी खेळीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे

जॉर्ज मुन्सी
author img

By

Published : Apr 23, 2019, 7:06 PM IST

नवी दिल्ली - स्कॉटलंड येथे चालू असलेल्या एका स्थानीक टी-२० स्पर्धेत जॉर्ज मुन्सी नावाच्या फलंदाजाने आपल्या वादळी खेळीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. त्याने ग्लोसेंस्टरशायर Second XI या संघाकडून खेळताना बाथ सीसी संघाविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार खेचत २५ चेंडूत शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे.

या सामन्यात सलामीला आलेल्या जॉर्जने ३९ चेंडूत १४७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने तब्बल २० षटकार आणि ५ चौकारांचा पाऊस पाडला. जॉर्जच्या या वादळी खेळीच्या जोरावर ग्लोसेंस्टरशायर संघाने निर्धारीत २० षटकांमध्ये ३ विकेट गमावत ३२६ धावांचा डोंगर रचला. अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना बाथ सीसी संघ निर्धारीत २० षटकांमध्ये २१४ धावा करू शकल्याने ग्लोसेंस्टरशायरने ११२ धावांनी विजय मिळवला.

जॉर्ज हा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर असून त्याने स्कॉटलंडसंघाचे प्रतिनिधीत्व करताना १६ वनडे आणि २६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Intro:Body:

Spo News 03

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

Spo News 03
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.