कराची - आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या टी२० आणि कसोटी संघाचे कर्णधार नेमले आहेत. या दौऱ्यासाठी सरफराज अहमदची टी२० संघांच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून बाबर आझमला कर्णधारपद देण्यात आले आहे. टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत बाबर आझम पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा - माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांच्यावर गुन्हा दाखल
पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व सरफराजकडेच राहणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, कसोटी संघाचे कर्णधारपद अझहर अलीकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षक मिसबाह उल हकने सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी शिफारस पीसीबीला केली होती. तेव्हाच सरफराजचे कर्णधारपद धोक्यात आले होते.
-
Sarfaraz Ahmed sacked as Pakistan tests and T20i captain. Azhar Ali named new test captain and Babar Azam named new T20i captain pic.twitter.com/f7KDPiCANj
— ANI (@ANI) October 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sarfaraz Ahmed sacked as Pakistan tests and T20i captain. Azhar Ali named new test captain and Babar Azam named new T20i captain pic.twitter.com/f7KDPiCANj
— ANI (@ANI) October 18, 2019Sarfaraz Ahmed sacked as Pakistan tests and T20i captain. Azhar Ali named new test captain and Babar Azam named new T20i captain pic.twitter.com/f7KDPiCANj
— ANI (@ANI) October 18, 2019
२०१७ चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर सरफराजचे नेतृत्व कमकुवत ठरले होते. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकला नाही. त्यानंतर घरच्या मैदानावर दुबळ्या श्रीलंका संघाने पाकिस्तानचा टी-२० मालिकेत ३-० ने पराभव केला आहे.