ETV Bharat / sports

धोनीच्या तुलनेवरून संजू सॅमसनने दिले भन्नाट उत्तर

शशी थरूर यांच्या ट्विटला राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सॅमसन म्हणाला, ''मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, धोनीसारखे कोणीही खेळू शकत नाही आणि कुणी तसा प्रयत्नही करू नये.''

author img

By

Published : Sep 30, 2020, 3:54 PM IST

sanju samson reacts on next mahendra singh dhoni comment
धोनीच्या तुलनेवरून संजू सॅमसनने दिले भन्नाट उत्तर

दुबई - इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज तुफान फॉर्मात आहे. त्याच्या झटपट खेळीमुळे सॅमसनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही सॅमसनच्या खेळीबाबत ट्विट केले होते. थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर संजूचे कौतुक करताना तो भारताचा पुढचा धोनी असेल, असे म्हटले. या तुलनेवरून सॅमसनने आपले मत दिले.

सॅमसन म्हणाला, ''मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, धोनीसारखे कोणीही खेळू शकत नाही आणि कुणीही तसा प्रयत्नही करू नये. धोनीसारखे खेळणे अजिबात सोपे नाही, म्हणून ते बाजूलाच ठेवले पाहिजे. मी कधी धोनीसारखा खेळण्याचा विचार करत नाही. तो भारतीय क्रिकेट आणि या खेळाचा दिग्गज खेळाडू आहे. मी काय करू शकतो, मी माझे सर्वोत्तम काम कसे करू शकतो आणि सामना कसा जिंकू शकतो यावर माझा भर असतो."

शशी थरूर यांच्या ट्विटला भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही उत्तर दिले होते. ''त्याला कोणासारखेही बनण्याची गरज नाही. तो भारतीय क्रिकेटमध्ये संजू सॅमसन म्हणून ओळखला जाईल'', असे गंभीरने म्हटले होते. शारजाहच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मयांक अग्रवालचे शतक आणि केएल राहुलचे अर्धशतक यांच्या जोरावर २२३ धावा जमवल्या. हे आव्हान राजस्थानने ४ गडी राखून पूर्ण केले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना रंगतदार ठरला. राजस्थानकडून संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि राहुल तेवतिया यांनी अर्धशतके झळकावली. पण राजस्थानच्या रॉयलच्या विजयात हीरो ठरला राहुल तेवतिया. त्याने प्रती षटक १४ धावांची गरज असताना अवघ्या १२ चेंडूत ४५ धावा केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.