ETV Bharat / sports

भारताचा युवा क्रिकेटपटू यो-यो चाचणीत उत्तीर्ण - संजू सॅमसन यो-यो टेस्ट

सॅमसनव्यतिरिक्त यष्टिरक्षक ईशान किशन, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि सिद्धार्थ कौल यांनीही यो-यो चाचणी उत्तीर्ण केली आहे.

भारताचा युवा क्रिकेटपटू यो-यो चाचणीत उत्तीर्ण

author img

By

Published : Feb 13, 2021, 1:12 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने यो-यो चाचणी पास केली आहे. त्याने स्वत: च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चाचणीची माहिती दिली. ''फिटनेस टेस्ट पास केली. आता लक्ष्य विजय हजारे ट्रॉफी'', असे त्याने ट्विटरवर लिहिले आहे.

हेही वाचा - रोनाल्डोची सोशल मीडियावर 'भन्नाट' कामगिरी

टीम इंडियाचे भविष्य म्हणून संजू सॅमसनकडे पाहिले जाते. सॅमसन सध्या भारतीय टी-२० संघाचा सदस्य आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सॅमसनला संघात जागा मिळाली होती. त्याने तीन सामन्यात १४१.१८च्या स्ट्राईक रेटने ४८ धावा केल्या.

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेपूर्वी संजू सॅमसनने पास केलेली यो-यो चाचणी, ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका १२ मार्चपासून सुरू होणार आहे. २६ वर्षीय संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी ७ टी-२० सामने खेळले आहेत यात त्याने ८३ धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.