दुबई - आयसीसीच्या एसीयूला (लाचलुचतपत प्रतिबंधक समिती) सहकार्य न केल्याचा ठपका ठेवत आयसीसीने माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर दोन वेगवेगळ्या आरोपांवरून दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.
आयसीसीच्या कलम 2.1.3, 2.1.1 चे उल्लघंन केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच कलम 2.4.7 एसीयूच्या तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला होता.
श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्याला लाच जेणे, आंतरराष्ट्रीय सामन्याचे निकाल प्रभावित करणे आणि भ्रष्टाचारविरोधी समितीच्या चौकशीत असहकार्य करण्याचे आरोप जयसूर्यावर लावण्या आले आहेत.
या माजी डावखुऱ्या खेळाडूला स्वत:विरुद्धच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहेत.