बर्लिन - भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये आयसीसीच्या विश्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या टिपलेल्या क्षणाला २०००-२०२० या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
अंतिम सामन्यात श्रीलंकाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सचिन तेंडुलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला 'कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असे शिर्षक देण्यात आले आहे. भारताने विश्व करंडक जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत 'लॅप ऑफ ऑनर' दिला होता. अनेक वर्ष देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनला तेव्हा आश्रू रोखता आले नव्हते. या क्षणाचा तो फोटो आहे.
क्रीडा विश्वातील ऑस्कर अशी ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्टस अवॉर्ड्सने सचिनला सन्मानित करण्यात आले. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सचिन तेंडुलकरने स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला.
विशेष बाब म्हणजे, या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली जाते. यासाठी काही दिवसांपासून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकर, लिओनाल मेस्सी, फॉर्मुला वनचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन यांच्यासह जगभरातील २० दावेदारांचं नामांकन होतं. दरम्यान, मेस्सी आणि लुईस यांना वर्षभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
-
🔈 Sound on 🔈
— Laureus (@LaureusSport) February 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A powerful, strong and moving tribute to a room full of sporting legends from @sachin_rt in honour of Nelson Mandela and the incredible power of sport to unite and inspire 👏#Laureus20 #SportUnitesUs pic.twitter.com/0z3mNatUFh
">🔈 Sound on 🔈
— Laureus (@LaureusSport) February 17, 2020
A powerful, strong and moving tribute to a room full of sporting legends from @sachin_rt in honour of Nelson Mandela and the incredible power of sport to unite and inspire 👏#Laureus20 #SportUnitesUs pic.twitter.com/0z3mNatUFh🔈 Sound on 🔈
— Laureus (@LaureusSport) February 17, 2020
A powerful, strong and moving tribute to a room full of sporting legends from @sachin_rt in honour of Nelson Mandela and the incredible power of sport to unite and inspire 👏#Laureus20 #SportUnitesUs pic.twitter.com/0z3mNatUFh