नवी दिल्ली - भारताची लोकप्रिय सलामीवीर जोडी सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजांची धुलाई करताना दिसणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये ही जोडी खेळणार आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूही सहभागी होणार आहेत.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी-२० स्पर्धेत क्रिकेट खेळणाऱ्या संघातील पाच संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि भारत या संघाचा समावेश असणार असल्याचे समजते. दरम्यान, या स्पर्धेत सचिन, सेहवाग यांच्यासह, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, जॉन्टी रोड्स सारखे दिग्गज खेळाडूही सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी २ ते १६ फेब्रुवारी या काळादरम्यान, करण्यात येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या स्पर्धेत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले ११० खेळाडू सहभागी होणार आहेत. सर्व खेळाडूंनी या स्पर्धेसाठी होकार कळवला आहे. महत्वाचे म्हणजे, बीसीसीआयने या टी-२० स्पर्धेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
हेही वाचा - दरवर्षी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा..आयसीसीची योजना, बीसीसीआयचा नकार
हेही वाचा - आयसीसीने वाढवली महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम, मिळणार इतके कोटी