ETV Bharat / sports

ICC WC २०१९ : महेंद्रसिंह धोनीच्या 'संथ' खेळीवर सचिन नाराज; दिली प्रतिक्रिया - afghanistan

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर संघाच्या कामगिरीवर खुश नाही आहे. त्याने एका मुलाखतीत, मधल्या फळीतील फलंदाज महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी संथ खेळी केल्याचे बोलुन दाखवले.

ICC WC २०१९ : महेंद्रसिंह धोनीच्या 'संथ' खेळीवर सचिन नाराज; दिली प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 23, 2019, 5:16 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला अफगाणिस्तानवर मात करताना पुरती 'दमछाक' झाली. मात्र, या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ११ धावांनी पराभव केला. या विजयानंतरही भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर संघाच्या कामगिरीवर खुश नाही. त्याने एका मुलाखतीत, मधल्या फळीतील फलंदाज महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी संथ खेळी केल्याचे बोलुन दाखवले.

सचिने भारतीय संघाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल थोडासा निराश आहे. आपण अजुन चांगला खेळ करु शकलो असतो. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी यांनी केलेल्या भागीदारी ही अतिशय संथ होती. आपण अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात ३४ षटके फिरकी गोलंदाजीवर खेळलो आणि यात फक्त ११९ धावा केल्या. फिरकी गोलंदाजीवर खेळताना आपण प्रचंड चाचपडत होतो. असं त्याने सांगितलं.

दरम्यान, महेंद्रसिंह धोनी याच्या संथ खेळीवरुन धोनीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. धोनी हा जगातील चांगला 'फिनिशर' खेळाडू आहे. असे असतानाही त्याने अफगाणिस्तानच्या विरोधात संथ केला. ३८ ते ४५ षटकाच्या दरम्यान, योग्य धावा फलंदाजांनी जमवल्या नसल्याचे सचिनने सांगितलं.

Intro:Body:

gause

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.