मुंबई - सचिन तेंडुलकरने जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या आईसाठी खास वांग्याचं भरीत बनवले होते. हे भरीत बनवतानाचा व्हिडीओ सचिनने आपल्या इन्स्टाग्रामअकाऊंटवर शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या व्हिडीओमध्ये सचिनने सांगितले की, 'त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा घरी नाहीत, म्हणून त्याने आईसाठी स्वतःच्या हाताने वांग्याचं भरीत बनवले आहे'. भरीत तयार झाल्यानंतर सचिनने ते आपल्या आईला टेस्ट करायला दिले. हे भरीत खाल्ल्यानंतर सचिनची आई रजनी तेंडुलकर या आपल्या मुलाचे तोंडभरून कौतुक करताना दिसली.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.