मुंबई - भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतूक केले. सिराज गोलंदाजीदरम्यान, आऊंटस्विंग चेंडू चांगल्या प्रकारे फेकत होता, असे सचिनने म्हटलं आहे.
२६ वर्षीय मोहम्मद सिराजने मेलबर्नमध्ये खेळवण्यात आलेल्या बॉक्सिंग डे कसोटीतून पदार्पण केले. यात त्याने पाच विकेट घेत आपली छाप सोडली. यानंतर सिडनी कोसोटीत त्याला दोन गडी बाद करता आले.
सिराजच्या गोलंदाजीचे कौतूक सचिनने केले. सोशल मीडियावर सचिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जेव्हा सिराज गोलंदाजी करता होता. तेव्हा तो खेळपट्टी खराब झालेल्या ठिकाणी टप्पा फेकत असल्याचे लोकांनी सांगितले. पण मी याहून काही वेगळेच अनुभवले, असल्याचे सचिनने सांगितले.
-
It was Mohd. Siraj's ability & not the pitch that brought the ball in yesterday on Day 1 of the 4th Test!#AUSvIND pic.twitter.com/P1NCqLGIeK
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">It was Mohd. Siraj's ability & not the pitch that brought the ball in yesterday on Day 1 of the 4th Test!#AUSvIND pic.twitter.com/P1NCqLGIeK
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 16, 2021It was Mohd. Siraj's ability & not the pitch that brought the ball in yesterday on Day 1 of the 4th Test!#AUSvIND pic.twitter.com/P1NCqLGIeK
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 16, 2021
सिराज आऊटस्विंग गोलंदाजीदरम्यान, चेंडू चांगल्या प्रकारे रिलीज करत होता. त्याची सीम पोझिशन दुसऱ्या स्लीपच्या बाजूने होती. कटर फेकताना तो चकमदार भाग ऑफसाइडकडे ठेवत होता. माझ्या मते, चेंडूची हालचाल ही खराब खेळपट्टीवर फेकल्याने नव्हे तर सिराजची ही प्रतिभाची कमाल आहे, असेही सचिनने सांगितले.
हेही वाचा - कोरोनावर मात करत मोईन अली इंग्लंड संघात दाखल
हेही वाचा - वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा; शाकिबची वापसी