डरबन - दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ११.२ षटकाचा खेळ झाला. त्यानंतर पावसाने मैदानात हजेरी लावली. निर्धारीत वेळेत पाऊस थांबला नाही. तेव्हा पंचांनी सामना रद्द करण्यात आला असल्याची घोषणा केली.
विशेष बाब म्हणजे, किंग्जमेड या मैदानावर आफ्रिका-इंग्लंड यांच्यातील सलग तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. याआधीही पावसामुळे उभय संघातील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते.
आफ्रिका-इंग्लंड यांच्यात ११ फेब्रुवारी २००५ ला खेळवण्यात आलेला सामना एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर या संघात ४ डिसेंबर २००९ ला सामना खेळवण्यात आला. पण हाही सामना पावसामुळे रद्द झाला. आता तिसरा सामनाही रद्द झाला आहे.
दरम्यान, उभय संघात ३ सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत असून पहिला सामना यजमान आफ्रिका संघाने जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. आता तिसरा आणि अखेरचा सामना ९ फेब्रुवारीला जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - तिरंगी मालिका : भारताच्या विजयात स्मृती चमकली, ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा
हेही वाचा - युवा विश्वचषक : जगज्जेतेपदासाठी भारताचा मुकाबला बांगलादेशशी