दुबई - दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथमच सलामीची संधी मिळालेल्या रोहित शर्माने दोनही डावात शतकं झळकावली. रोहितला या दमदार कामगिरीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात रोहितने दोन शतकासह ३०३ धावा केल्या. याच कामगिरीच्या जोरावर तो आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत कारकिर्दीती़ल सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत रोहित शर्माला संघात स्थान मिळाले नाही. या दौऱ्यानंतर निवड समितीने आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेसाठी विडींज दौऱ्यात खराब कामगिरी केलेल्या लोकेश राहुलचा पत्ता कट करत रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संधी दिली. तेव्हा रोहितने या संधीचे सोने केले. या सामन्यात दोन्ही डावांत रोहितने शतक झळकावत आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले.
हेही वाचा - पाकिस्तानचा ७ फूट १ इंच उंचपुरा गोलंदाज म्हणतो, गंभीरचं करियर मी संपवलं
रोहित शर्माने आफ्रिकेविरुध्दच्या विजयी सामन्यात दोनही डावात एकूण ३०३ धावा केल्या. यामुळे तो कसोटी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. रोहित या सामन्यापूर्वी क्रमवारीत ३७ स्थानावर होता. आता तो भरारी घेत १७ व्या स्थानी पोहोचला आहे.
हेही वाचा - IND VS SA : पुण्यात संघ दाखल, खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी