ETV Bharat / sports

रोहितच्या रडारवर यूएईची 'बस'... पाहा व्हिडिओ - rohit sharma bus hitting six

कुटुंबीयांसह सुट्टी घालवून परतलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा सराव करण्यासाठी परतला आहे. मुंबई इंडियन्सने रोहितचा सराव करताना एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याने एका फिरकीपटूला उत्तुंग षटकार खेचला आहे. इतकेच नव्हे तर, हिटमॅनचा हा षटकार मैदानाच्या बाहेर गेला असून हा चेंडू एका चालत्या बसवर आदळला. या षटकारासाठी मैदानात उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी रोहितचे कौतुक केले आहे.

rohit sharma hits a huge six in practice as ball hits a moving bus
रोहितच्या रडारवर यूएईची 'बस'... पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Sep 9, 2020, 7:53 PM IST

Updated : Sep 9, 2020, 8:47 PM IST

दुबई - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या पर्वाला फार कमी दिवस उरले असून सर्व संघांच्या खेळाडूंनीही आपली तयारी सुरू केली आहे. या हंगामाचा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

कुटुंबीयांसह सुट्टी घालवून परतलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा सराव करण्यासाठी परतला आहे. मुंबई इंडियन्सने रोहितचा सराव करताना एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याने एका फिरकीपटूला उत्तुंग षटकार खेचला आहे. इतकेच नव्हे तर, हिटमॅनचा हा षटकार मैदानाच्या बाहेर गेला असून हा चेंडू एका चालत्या बसवर आदळला. या षटकारासाठी मैदानात उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी रोहितचे कौतुक केले आहे.

यूएईमध्ये सद्याच्या घडीला उष्ण वातावरण असून पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचत आहे. यामुळे खेळाडूंना दिवसा सराव करणे शक्य होत नाही. पण दुपारच्या काळात जर खेळाडूंना एकत्र आणायचे असेल तर काय करता येईल, याचा आढावाही काही संघांनी घेतला आहे.

दरम्यान, आयपीएलचा १३वा हंगाम ५३ दिवसांचा आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजाहमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील. बीसीसीआयने साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Last Updated : Sep 9, 2020, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.