ETV Bharat / sports

ICC Test Rankings: रोहित शर्मा 'टॉप-१०' मध्ये दाखल - आयसीसी कसोटी रॅकिंग न्यूज

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे. त्याला सहा स्थानांनी बढती मिळून तो आठव्या स्थानी विराजमान झाला. यादीत वरील ७ फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. विराट पाचव्या स्थानी कायम आहे.

rohit sharma enters top 10 in icc test rankings
ICC Test Rankings: रोहित शर्मा 'टॉप-१०' मध्ये दाखल
author img

By

Published : Feb 28, 2021, 3:44 PM IST

दुबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून जिंकला. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी चांगली कामगिरी नोंदवली. त्यांच्या या दमदार कामगिरीचा फायदा त्यांना झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत त्यांना बढती मिळाली.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे. त्याला सहा स्थानांनी बढती मिळून तो आठव्या स्थानी विराजमान झाला. यादीत वरील ७ फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. विराट पाचव्या स्थानी कायम आहे.

गोलंदाजांच्या यादीत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला ४ स्थानांची बढती मिळाली असून तो तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात ११ विकेट घेणारा भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल ३८ व्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत जसप्रीत बुमराहची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानी पोहोचला आहे.

हेही वाचा - भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका महाराष्ट्रात होणार; ठाकरे सरकारचा हिरवा कंदिल

हेही वाचा - जेव्हा तुम्ही जो रुट सारख्या महान फलंदाजाला महान गोलंदाज होताना पाहता.., अहमदाबादच्या खेळपट्टीवर वेंगसकरांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.