नवी दिल्ली - भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा अॅथलीट मारियाप्पन थांगावेलु आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्रा यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने निवड समितीच्या शिफारशीस मान्यता दिली असून देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच संयुक्तपणे पाच खेळाडूंची निवड झाली आहे.
-
Cricketer Rohit Sharma, para-athlete Mariappan Thangavelu, table tennis champion Manika Batra, wrestler Vinesh Phogat & hockey player Rani to get Rajiv Gandhi Khel Ratna Award. pic.twitter.com/WwUOrGXqfT
— ANI (@ANI) August 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cricketer Rohit Sharma, para-athlete Mariappan Thangavelu, table tennis champion Manika Batra, wrestler Vinesh Phogat & hockey player Rani to get Rajiv Gandhi Khel Ratna Award. pic.twitter.com/WwUOrGXqfT
— ANI (@ANI) August 21, 2020Cricketer Rohit Sharma, para-athlete Mariappan Thangavelu, table tennis champion Manika Batra, wrestler Vinesh Phogat & hockey player Rani to get Rajiv Gandhi Khel Ratna Award. pic.twitter.com/WwUOrGXqfT
— ANI (@ANI) August 21, 2020
गेल्या चार वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीच्या आधारावर हा पुरस्कार देण्यात येतो. प्रशस्तीपत्र, शाल याव्यतिरिक्त खेळाडूला 7.50 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते.तर, यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटपटू इशांत शर्मा, दीप्ती शर्मा, धावपटू द्युती चंद, नेमबाज मनू भाकेरसह २७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या १२ सदस्यीय निवड समितीने ही शिफारस केली होती.
-
Cricketers Ishant Sharma and Deepti Sharma, athlete Dutee Chand, shooter Manu Bhaker among 27 sportspersons to be conferred with Arjuna Award. https://t.co/X2d7SNSc7j
— ANI (@ANI) August 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cricketers Ishant Sharma and Deepti Sharma, athlete Dutee Chand, shooter Manu Bhaker among 27 sportspersons to be conferred with Arjuna Award. https://t.co/X2d7SNSc7j
— ANI (@ANI) August 21, 2020Cricketers Ishant Sharma and Deepti Sharma, athlete Dutee Chand, shooter Manu Bhaker among 27 sportspersons to be conferred with Arjuna Award. https://t.co/X2d7SNSc7j
— ANI (@ANI) August 21, 2020
रोहितपूर्वी, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या क्रिकेटपटूंना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. १९९८मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. २००७मध्ये भारताला टी-२० विश्वविजेता बनवल्यानंतर धोनीने तर, २०१८मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूसमवेत विराट कोहलीने हा पुरस्कार पटकावला होता.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग, माजी पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा बरुआ मेहता, बॉक्सर वेंकटेशन देवराजन, क्रीडा भाष्यकार अनिश बटाविया आणि पत्रकार आलोक सिन्हा आणि नीरू भाटिया यांचा समावेश होता.