मुंबई - भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात ५६ धावांची खेळी केली. रोहितच्या खेळीने भारताला सामन्यात विजय मिळाला नसली तरी त्याने अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. रोहितने सर्वात वेगवान ८ हजार धावा काढताना माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
India's @ImRo45 reaches 8,000 ODI runs! 🙌
— ICC (@ICC) March 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He makes it to the mark in his 200th ODI innings - the joint-third fastest to the mark alongside @SGanguly99! #INDvAUS pic.twitter.com/mNo1Zq0iD7
">India's @ImRo45 reaches 8,000 ODI runs! 🙌
— ICC (@ICC) March 13, 2019
He makes it to the mark in his 200th ODI innings - the joint-third fastest to the mark alongside @SGanguly99! #INDvAUS pic.twitter.com/mNo1Zq0iD7India's @ImRo45 reaches 8,000 ODI runs! 🙌
— ICC (@ICC) March 13, 2019
He makes it to the mark in his 200th ODI innings - the joint-third fastest to the mark alongside @SGanguly99! #INDvAUS pic.twitter.com/mNo1Zq0iD7
रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत २०० डाव खेळताना ८ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात वेगवान ८ हजार धावा करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे आहे. विराटने अवघ्या १७५ डावांत ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर, दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलिअर्स असून त्याने १८२ डावांत ८ हजार धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांनी प्रत्येकी २०० डावात ८ हजार धावा केल्या आहेत.
भारताकडून ८ हजार धावा काढणारा रोहित नववा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी कोहली, गांगुली, तेंडुलकर, धोनी, द्रविड, सेहवाग, युवराज, मो. अझरुद्दीन यांनी ८ हजार धावांचा टप्पा पार केला होता.
रोहितने याबरोबरच धावा काढण्याचा बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला (७९८१) मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहितची खराब सुरुवात झाली होती. रोहितला पहिल्या ३ सामन्यांत अवघ्या ५१ धावा करता आल्या होत्या. चौथ्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी करताना ९५ आणि पाचव्या सामन्यात ५६ धावांची खेळी केली होती.