माउंट माउंगानुई - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघावर फॉलोऑनचे सावट होते. तेव्हा पाकच्या मोहम्मद रिजवान आणि फहिम अशरफ या दोघांनी चिवट खेळी करत न्यूझीलंडचे मनसुबे उधळून लावले. पाकचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाचा खेळ, काही षटके शिल्लक असताना २३९ धावांत आटोपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ४३१ धावा केल्या आहेत. यामुळे त्यांच्याकडे १९२ धावांची मजबूत आघाडी आहे.
पाकची अवस्था एकवेळ ६ बाद ८० अशी झाली होती. तेव्हा रिजवान आणि अशरफ यांनी भागिदारी रचत पाकिस्तानला फॉलोऑनपासून वाचवले. रिजवानने १४२ चेंडूचा सामना करताना आठ चौकारासह ७१ धावा केल्या. तर अशरफने १३४ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकारासह ९१ धावांची खेळी केली. दोघे बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि पाकचा संघ २३९ धावांवर आटोपला.
तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला पाकने १ बाद ३० वरून डावाला सुरूवात केली. तेव्हा आबिद अली, मोहम्मद अब्बास दोन षटकातच माघारी परतले. यानंतर अझहर अली (५), हॅरिस सोहेल (३) आणि फवाद आलम (६) स्वस्तात बाद झाले. यामुळे पाकिस्तानवर फॉलोऑनचे सावट निर्माण झाले. तेव्हा रिजवान आणि अशरफ या जोडीने पाकिस्तान संघाला संकटातून बाहेर काढले. न्यूझीलंडकडून कायले जेमिसन ३, नील वॅग्नर, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
हेही वाचा - ICC Awards : विराट दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू; स्मिथची कसोटीत बाजी
हेही वाचा - ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार