दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील तिसरा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि डेव्हिड वॉर्नरच्या सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज होणार आहे. दोन्ही संघ विजयी सुरूवात करण्यासाठी इच्छुक आहे. यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. या सामन्याला सायंकाळी ७:३० वाजता सुरूवात होईल.
उभय संघांत आक्रमक फलंदाजांचा समावेश असून काहीजण एकट्याच्या बळावर सामन्याचा निकालास कलाटणी देण्यास सक्षम आहेत. बंगळुरू संघात कर्णधार विराट कोहली याच्यासह ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार अॅरोन फिंच आहे. याशिवाय एबी डिव्हिलिअर्स, ख्रिस मॉरिस, मोईन अली, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेन स्टेन, मोहम्मद सिराज असे मजबूत खेळाडू देखील आहेत.
दुसऱ्या बाजूला सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या स्पर्धेत तीनवेळा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायजर्सने २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. यावेळी वॉर्नरसोबत जॉनी बेयरस्टॉ सलामीला उतरणार आहे. याशिवाय सनरायजर्स संघात केन विलियम्सन, मनीष पांडे, मिशेल मार्श, फॅबियन अॅलेन आणि राशिद खान यांच्यासारखे खेळाडू आहेत.
- आरसीबीचा संघ -
- विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, जोश फिलिप, मोइन अली, अॅरोन फिंच, एबी डिविलियर्स, शहबाज अहमद, पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, इसुरु उडाना, डेन स्टेन, पवन नेगी, देवदत्त पड्डीकल, शिवम दुबे, उमेश यादव, गुरुकीरत मान सिंह, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झम्पा.
- सनरायजर्स हैदराबादचा संघ -
- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बासिल थाम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टानलेक, जॉनी बेयरेस्टो, केन विलियमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, विराट सिंह, प्रियम गर्ग, मिशेल मार्श, संदीप बावनका, फॅबियन अॅलेन, अब्दुल समद आणि संजय यादव.