बंगळुरू - आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या १२ व्या मौसमात नवा पराक्रम केला आहे. त्याने कोलकाताविरुद्ध ८४ धावांची सुरेख खेळी करत सुरैश रैनाचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. आता विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे.
विराटच्या नावावर सध्याच्या घडीच्या ५ हाजर ११० धावा जमा आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या सामन्यात त्याला चमक दाखवविता आली नाही. पहिल्याच सामन्यात हा विक्रम तो करु शकला असता. पण त्याची बॅट म्हणावी तशी चालली नाही. विराटला रैनाच्या आधी ५ हजार धावा करण्याची संधी होती. मात्र सलग ४ सामन्यात विराट अपयशी ठरला. आयपीएलमध्ये सर्वात आधी ५ हजार धावा करण्याचा मान पहिल्यांदा सुरैश रैनाने मिळविला आहे.
कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात विराटने ४९ चेंडूत ८४ धावा केल्या. त्यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याला एबी डिव्हिलियर्सने ३२ चेंडूत ६३ धावा काढून सुरेख साथ दिली. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने २०५ धावा केल्या.