विशाखापट्टणम - सध्या भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवसअखेर डी कॉक आणि एल्गारच्या खेळीमुळे आफ्रिका संघाने भारताला दमदार प्रत्युत्तर दिले. आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना हैराण केले असले तरी, भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने या सामन्यात एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
-
Ravindra Jadeja's double hundred!! The fastest ever pic.twitter.com/omR7aUjkte
— Inswinging Yorker (@InswingingY) October 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ravindra Jadeja's double hundred!! The fastest ever pic.twitter.com/omR7aUjkte
— Inswinging Yorker (@InswingingY) October 4, 2019Ravindra Jadeja's double hundred!! The fastest ever pic.twitter.com/omR7aUjkte
— Inswinging Yorker (@InswingingY) October 4, 2019
हेही वाचा - कपिल देव यांच्यापाठोपाठ अंशुमान गायकवाड यांचाही राजीनामा
या सामन्यात डावखुरा गोलंदाज म्हणून फिरकीपटू रविंद्र जडेजाने कसोटीतील सर्वात जलद २०० बळी मिळवण्याची किमया केली. दीडशतकवीर डीन एल्गारला बाद करत त्याने हा विक्रम रचला. या विक्रमामध्ये जडेजाने श्रीलंकेच्या रंगना हेराथला मागे टाकले. त्याने ४७ कसोटी सामन्यांत २०० बळी मिळवले होते. तर, जडेजाने ४४ सामन्यांतच २०० बळी मिळवले आहेत. या दोन खेळाडूनंतर, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनने ४९ कसोटी सामन्यांत २०० बळी मिळवले आहेत.
तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिका संघाच्या ८ बाद ३८५ धावा -
डीन एल्गारची दीडशतकी आणि क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिका संघाने भारताला दमदार प्रत्युत्तर दिले आहे. तिसऱ्या दिवसअखेर पाहुण्या संघाच्या ८ बाद ३८५ धावा झाल्या असून ११७ धावांनी आफ्रिका पिछाडीवर आहे.
कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि एल्गारने संघाचा डाव सावरल्यानंतर डी कॉकच्या शतकी धावांच्या खेळीने संघाला साडेतीनशेचा टप्पा गाठता आला. डीन एल्गारने २८७ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १६० धावा केल्या. त्याला फिरकीपटू रविंद्र जडेजाने माघारी धाडले. तर, डी कॉकने १६ चौकार आणि २ षटकारांसह १११ धावांची अफलातून खेळी करत भारतीय गोलंदाजांना हैराण केले. अश्विनने डी कॉकला बाद केले. या सामन्यात अश्विनने १२८ धावा देत पाच बळी मिळवले आहेत. दिवस संपला तेव्हा केशव महाराज ३ आणि सेनुरन मुथुसामी १२ धावांवर खेळत होते.