विशाखापट्टणम - भारत आणि आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीमध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विने दमदार पुनरागमन केले. त्याने आफ्रिकेच्या पहिल्या डावाला सुरुंग लावत ७ गडी बाद केले. पाचव्या दिवशी त्याने अजून एका फलंदाजाला बाद करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
हेही वाचा- चाहत्यांनी पाठवलेले फोटो पाहून फेडररही अवाक्!
आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या ब्रायनला बाद करत अश्विनने मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली. अश्विन हा भारताकडून सर्वात जलद ३५० कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. ३३ वर्षीय अश्विनने ६६ कसोटी सामन्यात हा विक्रम केला.
-
🚨 350 Test wickets for Ravichandran Ashwin 🚨
— ICC (@ICC) October 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He has dismissed Theunis de Bruyn to become the joint-fastest to the milestone alongside Muttiah Muralitharan – in just 66 matches!
Follow #INDvSA LIVE 👇https://t.co/dCGJ4Pcug5 pic.twitter.com/I8XVEaBiLZ
">🚨 350 Test wickets for Ravichandran Ashwin 🚨
— ICC (@ICC) October 6, 2019
He has dismissed Theunis de Bruyn to become the joint-fastest to the milestone alongside Muttiah Muralitharan – in just 66 matches!
Follow #INDvSA LIVE 👇https://t.co/dCGJ4Pcug5 pic.twitter.com/I8XVEaBiLZ🚨 350 Test wickets for Ravichandran Ashwin 🚨
— ICC (@ICC) October 6, 2019
He has dismissed Theunis de Bruyn to become the joint-fastest to the milestone alongside Muttiah Muralitharan – in just 66 matches!
Follow #INDvSA LIVE 👇https://t.co/dCGJ4Pcug5 pic.twitter.com/I8XVEaBiLZ
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३५० बळी मिळवण्याचा पराक्रम श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर होता. आता अश्विनने मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या विक्रमासोबत अश्विनने भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनाही मागे टाकले आहे. कुंबळेने ७७ सामन्यांमध्ये ३५० बळी घेतले होते.