चेन्नई - रविचंद्रन अश्विन याने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान, एका विक्रमाची नोंद केली. त्याने रोरी बर्न्सची विकेट डावाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली. अशा कारनामा करणारा तो भारताचा पहिलाच फिरकीपटू गोलंदाज ठरला आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पहिले षटक अश्विनने फेकले. यातील पहिल्या चेंडूवर त्याने रोरी बर्न्सला बाद केलं. झपकन वळलेला चेंडू बर्न्सला काही कळायच्या आत बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये उभारलेल्या अजिंक्य रहाणेच्या हातात जाऊन विसावला. अश्विन कसोटीच्या कोणत्याही डावात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा भारताचा पहिला फिरकीपटू गोलंदाज ठरला आहे.
-
Ashwin strikes straight away!
— BCCI (@BCCI) February 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rory Burns departs for a duck.
Live - https://t.co/VJF6Q62aTS #INDvENG @Paytm pic.twitter.com/vgrBCbFQEp
">Ashwin strikes straight away!
— BCCI (@BCCI) February 8, 2021
Rory Burns departs for a duck.
Live - https://t.co/VJF6Q62aTS #INDvENG @Paytm pic.twitter.com/vgrBCbFQEpAshwin strikes straight away!
— BCCI (@BCCI) February 8, 2021
Rory Burns departs for a duck.
Live - https://t.co/VJF6Q62aTS #INDvENG @Paytm pic.twitter.com/vgrBCbFQEp
फिरकीपटू बॉबी पीलने १८८८ साली अॅशेस मालिकेदरम्यान, असा कारनामा केला होता. मॅनचेस्टर येथे झालेल्या सामन्यातील दुसऱ्या डावात पीलने एलेक बॅनरमॅन याला बाद केले होते. यानंतर १९०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू बर्ट वोगलर याने अशी कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या टॉम हेवर्डला ओव्हल मैदानात बाद केले होते.
हेही वाचा - ऋषभ पंतने पटकावला आयसीसीचा मानाचा पुरस्कार
हेही वाचा - IND vs ENG : भारताला फॉलोऑन न देता इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय