ETV Bharat / sports

आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज गावडेची अष्टपैलू कामगिरी

रत्नागिरी जिल्हा संघाचा पहिला सामना उस्मानाबाद संघाशी झाला. यात अविराजने २ गडी बाद केले. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा संघाबरोबर झालेल्या सामन्यात त्याने अष्टपैलू खेळी केली. या सामन्यात त्याने ४ विकेटसह १७ चेंडूत ३३ धावा काढल्या. रत्नागिरीचा तिसरा सामना पुण्याच्या डी. वाय. पाटील संघाशी झाला. या सामन्यात अविराजने हॅट्ट्रिकसह पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले.

Ratnagiri's Aviraj Gowde all-round performance in the Inter-District Cricket Tournament
आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज गावडेची अष्टपैलू कामगिरी
author img

By

Published : Mar 3, 2020, 8:22 PM IST

रत्नागिरी - कोल्हापूरच्या किर्लोस्करवाडीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघातील अविराज गावडे याने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. त्याने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात १५ गडी बाद केले आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाने चांगली कामगिरी केली आहे. यात अविराज याने संघाच्या विजय मोलाचे योगदान दिले. रत्नागिरी जिल्हा संघाचा पहिला सामना उस्मानाबाद संघाशी झाला. यात अविराजने २ गडी बाद केले. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा संघाबरोबर झालेल्या सामन्यात त्याने अष्टपैलू खेळी केली. या सामन्यात त्याने ४ विकेटसह १७ चेंडूत ३३ धावा काढल्या. रत्नागिरीचा तिसरा सामना पुण्याच्या डी. वाय. पाटील संघाशी झाला. या सामन्यात अविराजने हॅट्ट्रिकसह पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले.

अविराजने भारताच्या पश्चिम विभागाच्या १६ वर्षाखालील संघात खेळताना दमदार कामगिरी नोंदवत चांगली छाप सोडली होती. भविष्यात अधिकाधिक चांगला खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून देणे, हे आपले ध्येय असल्याचे अविराजने सांगितलं.

आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेतील अविराजची कामगिरी पाहून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदय सामंत यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी अविराजला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सामंत यांच्यासह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किरण सामंत, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बिपीन बंदरकर, सचिव सुरेश जैन, सहसचिव दीपक देसाई, दीपक मोरे आदींनी अविराजचे अभिनंदन केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.