धर्मशाळा - रणजी करंडक स्पर्धेत मुंबईच्या सर्फराज खानने सलग दुसरे द्विशतक झळकावले. त्याने हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केली. गेल्याच सामन्यात सर्फराजने उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद ३०१ धावांची खेळी केली होती. तो हिमाचल विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी द्विशतकासह नाबाद असून दुसऱ्या दिवशी आणखी एक त्रिशतक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रणजी करंडक स्पर्धेत सोमवारपासून सातव्या फेरीला सुरूवात झाली आहे. मुंबई-हिमाचल यांच्यात धर्मशाळाच्या मैदानात या फेरीचा सामना खेळवण्यात येत आहे. हिमाचलने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा मुंबईची सुरूवात खराब झाली. पहिल्या सहा षटकातच मुंबईचे ३ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर सिद्धेश लाडही बाद झाल्याने मुंबईची अवस्था ४ बाद ७१ अशी झाली होती. पण त्यानंतर सर्फराज पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आला. त्याने १९९ चेंडूत द्विशतक पूर्ण केले आणि मुंबईचा डाव सावरला. मुंबईने पहिला दिवसाअखेर ५ बाद ३७२ धावा केल्या आहेत.
-
DOUBLE HUNDRED: There's no stopping Sarfaraz Khan! 👏👏
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He has now crossed the 200-run mark in two successive innings in this @paytm #RanjiTrophy season. 👌👌
Follow it live 👉👉 https://t.co/OljC14skZn#HPvMUM pic.twitter.com/g3DqKFytxO
">DOUBLE HUNDRED: There's no stopping Sarfaraz Khan! 👏👏
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2020
He has now crossed the 200-run mark in two successive innings in this @paytm #RanjiTrophy season. 👌👌
Follow it live 👉👉 https://t.co/OljC14skZn#HPvMUM pic.twitter.com/g3DqKFytxODOUBLE HUNDRED: There's no stopping Sarfaraz Khan! 👏👏
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2020
He has now crossed the 200-run mark in two successive innings in this @paytm #RanjiTrophy season. 👌👌
Follow it live 👉👉 https://t.co/OljC14skZn#HPvMUM pic.twitter.com/g3DqKFytxO
सर्फराज खान या सामन्यात २१३ चेंडूत २२६ धावांसह नाबाद खेळत आहे. त्याने ३२ चौकार आणि ४ षटकरांसह ही खेळी साकारली. कर्णधार आदित्य तरे (६२) आणि शुभम रंजाने (नाबाद ४४) यांनी सर्फराजला चांगली साथ दिली. दरम्यान, सर्फराजने मुंबईतील वानखेडे मैदानावर उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफान खेळी केली होती. उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने ३९१ चेंडूत नाबाद ३०१ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या सामन्यात सर्फराजने आणखी एक शानदार खेळी केली आहे.
हेही वाचा - IND Vs NZ : टीम इंडियाला इतिहास रचण्याची नामी संधी
हेही वाचा - U-१९ World Cup : भारत उपांत्य फेरीत, आता गाठ ऑस्ट्रेलियाशी