ETV Bharat / sports

ENGvsPAK : पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ वाया

author img

By

Published : Aug 16, 2020, 10:40 AM IST

तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू खेळवण्यात आला नाही. वेळेची मुदत संपल्यानंतर पंचांनी दिवस संपल्याची घोषणा केली.

rain washes out third day of England vs Pakistan second test
ENGvsPAK : पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ वाया

साउथम्प्टन - एजेस बाऊल येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू खेळवण्यात आला नाही. वेळेची मुदत संपल्यानंतर पंचांनी दिवस संपल्याची घोषणा केली.

मोहम्मद रिझवानच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ९ बाद २२३ धावा केल्या आहेत. नसीम शाह १ आणि रिझवान ६० धावांवर खेळत होते. रिझवानने आपल्या खेळीत ५ चौकार लगावले. दुसऱ्या बाजूने त्याला एकाही फलंदाजाची चांगली साथ लाभली नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी ३ तर, सॅम करन आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला. या कसोटीत नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान १-० ने पिछाडीवर आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.