दुबई - अमेरिका आणि युनायटेड अरब अमीरात (युएई) यांच्यातील पहिला टी-ट्वेन्टी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. अमेरिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा केल्या होत्या.
The 1st T20I between UAE and USA in Dubai has been abandoned due to rain.
— ICC (@ICC) March 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
UAE were 29/2 after 3.3 overs of the chase after USA had made 152/7 from 15 overs of their maiden T20I innings.
SCORECARD ➡️ https://t.co/VLX9UgZkwn pic.twitter.com/Fv9pRqbuLl
">The 1st T20I between UAE and USA in Dubai has been abandoned due to rain.
— ICC (@ICC) March 15, 2019
UAE were 29/2 after 3.3 overs of the chase after USA had made 152/7 from 15 overs of their maiden T20I innings.
SCORECARD ➡️ https://t.co/VLX9UgZkwn pic.twitter.com/Fv9pRqbuLlThe 1st T20I between UAE and USA in Dubai has been abandoned due to rain.
— ICC (@ICC) March 15, 2019
UAE were 29/2 after 3.3 overs of the chase after USA had made 152/7 from 15 overs of their maiden T20I innings.
SCORECARD ➡️ https://t.co/VLX9UgZkwn pic.twitter.com/Fv9pRqbuLl
युएईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयसीसी अकादमी, दुबई येथे झालेल्या या सामन्यात पावसामूळे व्यत्ययामुळे १५ षटकांचा सामना करण्यात आला. अमेरिकेच्या संघाने चांगली फलंदाजी करताना स्टीव्ह टेलरच्या ३९ चेंडूत ७२ धावांच्या खेळीच्या बळावर १५२ धावा केल्या.
अमेरिकेने फलंदाजीत चांगली कामगिरी केल्यानंतर गोलंदाजीतही चांगली सुरुवात केली. गोलंदाज जेस्सी सिंगने पहिल्या षटकाच्या दुसऱयाच चेंडूवर सलामीवीर अश्पाक अहमद आणि तिसऱ्या षटकात रोहन मुस्तफा बाद केले. युएईचा संघ ३.३ षटकात २९ धावांवर खेळत असताना जोरदार पाऊस सुरू झाला. यानंतर, पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेचा संघ सध्या युएई दौऱ्यावर आहे. मालिकेतील दुसरा टी-ट्वेन्टी सामना याच मैदानावर १६ मार्चला होणार आहे.