ETV Bharat / sports

टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणतो, 'मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडते' - टीम इंडिया

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात अजिंक्य रहाणेने आपले मत मांडले.

टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणतो, 'मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडते'
author img

By

Published : Aug 4, 2019, 12:45 PM IST

कोलकाता - भारताची विंडीजसोबतची मालिका शनिवारपासून सुरू झाली आहे. एकदिवसीय मालिकेनंतर 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आपल्या फलंदाजी करताना संघातील आवडीचे स्थान सांगितले आहे. त्याने 'मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडते' असे म्हटले आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात अजिंक्य रहाणेने आपले मत मांडले. त्यावेळी तो म्हणाला, 'चांगली गोष्ट आहे की पुरस्कार वितरणाच्या वेळी माझा क्रमांक चौथा आहे. मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडते आणि हेच माझे आवडते स्थान आहे.' सीएबीच्या या सोहळ्यासाठी रहाणेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते.

रहाणे पुढे म्हणाला, 'आपल्याला सर्वांना माहित आहे की विंडीजचा संघ धक्का देणारा संघ म्हणून ओळखला जातो. पण, मी या मालिकेसाठी तयार आहे.' रहाणेने नुकताच एनसीएमध्ये राहुल द्रवीडच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. त्यामुळे त्याने तिथला अनुभवही सांगितला. तो म्हणाला, 'द्रवीड माझा आदर्श आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. मुंबईत सध्या पाऊस असल्याने मी बंगळुरूत सराव करत होतो.

Intro:Body:

टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणतो, 'मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडते'

कोलकाता - भारताची विंडीजसोबतची मालिका कालपासून सुरु झाली आहे. एकदिवसीय मालिकेनंतर 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आपल्या फलंदाजी करताना संघातील आवडीचे स्थान सांगितले आहे. त्याने 'मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडते' असे म्हटले आहे. 

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक (सीएबी) पुरस्कार वितरण सोहळ्यात अजिंक्य रहाणेने आपले मत मांडले. त्यावेळी तो म्हणाला, 'चांगली गोष्ट आहे की पुरस्कार वितरणाच्या वेळी माझा क्रमांक चौथा आहे. मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडते. आणि हेच माझे आवडते स्थान आहे.' सीएबीच्या या सोहळ्यासाठी रहाणेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते.

रहाणे पुढे म्हणाला, 'आपल्याला सर्वांना माहित आहे की विंडीजचा संघ धक्का देणारा संघ म्हणून ओळखला जातो. पण, मी या मालिकेसाठी तयार आहे.' रहाणे सध्या एनसीएमध्ये राहुल द्रवीडच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. त्यामुळे त्याने तिथला अनुभवही सांगितला. तो म्हणाला, 'द्रवीड माझा आदर्श आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. मुंबईत सध्या पाऊस असल्याने मी बंगळूरुत सराव करत होतो.'

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.