हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरला ट्रोल केले आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर वॉर्नर आता काय करणार असा प्रश्न अश्विनने उपस्थित केला. भारत सरकारने काल सोमवारी 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली. टिकटॉक हे अॅपही या यादीत समाविष्ट आहे.
लॉकडाऊनमध्ये वॉर्नरने अनेक टिकटॉक व्हिडिओ बनवले. या व्हिडिओद्वारे वॉर्नरने त्याची पत्नी कँडिस आणि मुलींसह आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले. मात्र, टिक टॉक बंदीनंतर अश्विनने वॉर्नरला टॅग करत एक मजेदार प्रश्न विचारला.
अश्विनने ट्विटरवर वॉर्नरसाठी फिल्मी स्टाईलमध्ये ट्विट केले. ''अप्पो अन्वर'', असे अश्विनने टिक टॉकवर म्हटले. सुपरस्टार अभिनेता रजनीकांतच्या 1995 च्या 'माणिक बाशा' चित्रपटाचा हा एक संवाद आहे. आता काय करणार? असा या संवादाचा अर्थ आहे.
-
Appo Anwar? @davidwarner31 😉 https://t.co/5slRjpmAIs
— Ashwin (During Covid 19)🇮🇳 (@ashwinravi99) June 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Appo Anwar? @davidwarner31 😉 https://t.co/5slRjpmAIs
— Ashwin (During Covid 19)🇮🇳 (@ashwinravi99) June 29, 2020Appo Anwar? @davidwarner31 😉 https://t.co/5slRjpmAIs
— Ashwin (During Covid 19)🇮🇳 (@ashwinravi99) June 29, 2020
टिक-टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम '69-अ'मध्ये दिलेल्या तरतुदींचा वापर करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारी ही अॅप्स आहेत. त्यामुळे, या अॅप्सना देशात बंदी घालण्यात आली आहे.
या अॅप्सवर घालण्यात आली बंदी -
टिक-टॉक, शेअर-इट, क्वाई, यूसी ब्राऊजर, बायडू मॅप, शेईन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हेलो, लाईकी, यूकॅम मेकअप, एमआय कम्युनिटी, सीएम ब्राऊजर, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊजर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, ब्यूट्रीप्लस, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेन्डर, क्यूक्यू म्युूझिक, क्यूक्यू न्यूजफीड, बिंगो लाईव्ह, सेल्फिसिटी, मेलमास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडिओ कॉल, वुईसिंक, ईएस फाईल एक्सप्लोरर, व्हिवा व्हिडिओ, मेईटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट - हाईड, कॅशे क्लीनर, डीयू क्लीनर, डीयू ब्राऊजर, हागो, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेयर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बाईडू ट्रान्सलेट, व्ही-मेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू सिक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लॉंचर, यू व्हिडिओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड्स, डीयू प्रायव्हसी.