मुंबई - भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या दशकामध्ये अश्विनने इतर गोलंदाजांना न जमलेली कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या दशकामध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा पराक्रम अश्विनच्या नावावर झाला आहे.
-
Most international wickets this decade:
— ICC (@ICC) December 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1️⃣ – @ashwinravi99 (564)
2️⃣ – @jimmy9 (535)
3️⃣ – @StuartBroad8 (525)
4️⃣ – Tim Southee (472)
5️⃣ – @trent_boult (458) pic.twitter.com/mkMI5g0VRR
">Most international wickets this decade:
— ICC (@ICC) December 24, 2019
1️⃣ – @ashwinravi99 (564)
2️⃣ – @jimmy9 (535)
3️⃣ – @StuartBroad8 (525)
4️⃣ – Tim Southee (472)
5️⃣ – @trent_boult (458) pic.twitter.com/mkMI5g0VRRMost international wickets this decade:
— ICC (@ICC) December 24, 2019
1️⃣ – @ashwinravi99 (564)
2️⃣ – @jimmy9 (535)
3️⃣ – @StuartBroad8 (525)
4️⃣ – Tim Southee (472)
5️⃣ – @trent_boult (458) pic.twitter.com/mkMI5g0VRR
हेही वाचा - AUS VS NZ : न्यूझीलंडने Boxing Day कसोटीसाठी संघात केलं बदल
या दशकामध्ये, अश्विनने गोलंदाजीमध्ये उत्तम प्रदर्शन करत ५६४ विकेट्स मिळवल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. त्याच्या खात्यात ५३५ बळींची नोंद आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचाच स्टुअर्ट ब्रॉड आहे. त्याच्या नावावर ५२५ विकेट्स आहेत. मात्र, या सर्वांना पछाडत अश्विनने पहिले स्थान गाठले आहे.
यंदाच्या वर्षात विशाखापट्टणम येथे झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने दमदार विजय मिळवला. बऱ्याच कालावधीपासून संघाबाहेर राहिलेल्या फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात सात विकेट घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले होते. या सामन्यात अश्विनने मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली. अश्विन हा भारताकडून सर्वात जलद ३५० कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला. ३३ वर्षीय अश्विनने ६६ कसोटी सामन्यात हा विक्रम केला आहे.