ETV Bharat / sports

IND VS SA : टीम इंडियासमोर ३ आव्हानं; आफ्रिकेचा संघ, साळगांवकराची खेळपट्टी अन्...

महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यातही पावसाने उपस्थिती दर्शवल्याने दुसरा सामना होणार की नाही यावर सशांकता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात पावसाची दाट शक्यता आहे. यावेळी तापमान 21 ते 31 डीग्री एवढे असेल, असेही म्हटले जात आहे. पावसामुळे कसोटी रद्द झाली तर दोन्ही संघांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने मोठा फटका बसू शकतो.

IND VS SA : टीम इंडियासमोर ३ आव्हान; आफ्रिकेचा संघ, साळगांवकराची खेळपट्टी, आणि...
author img

By

Published : Oct 9, 2019, 9:48 PM IST

पुणे - दक्षिण आफ्रिके विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने २०३ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर उद्या १० ऑक्टोबरपासून रंगणार आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला ३ आव्हानांना समोरे जावे लागणार आहे.

पहिले आव्हान दक्षिण आफ्रिकेचा संघ असून दुसरे आव्हान गहुंजे स्टेडियमचे प्रमुख क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी तयार केलेली खेळपट्टी आणि तिसरे आव्हान हे पावसाचे आहे.

महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यातही पावसाने उपस्थिती दर्शवल्याने दुसरा सामना होणार की नाही यावर सशांकता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात पावसाची दाट शक्यता आहे. यावेळी तापमान 21 ते 31 डीग्री एवढे असेल, असेही म्हटले जात आहे. पावसामुळे कसोटी रद्द झाली तर दोन्ही संघांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने मोठा फटका बसू शकतो.

फेब्रुवारी २०१७ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर बराच वाद झाला होता. फिरकीचा आखाडा ठरलेल्या त्या खेळपट्टीवर ३१ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले होते आणि सामना तीन दिवसातंच संपला होता. यामुळे भारतासमोरील खेळपट्टी हे आव्हान असणार आहे.

दरम्यान, मैदान व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार पाऊस थांबल्यानंतर १५ ते २० मिनिटात सामना पुन्हा सुरु होऊ शकतो. पुण्यातील सामना जर ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १३ गुण मिळतील. याउटल एखाद्या संघाने सामना जिंकला तर त्या संघाला ४० गुण मिळतील. यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्वाचा आहे.

हेही वाचा - भारतानं 'कबुल' म्हटलं तरच आशिया चषक पाकमध्ये होणार, अन्यथा...

हेही वाचा - धोनीच्या पुनरागमनाविषयी रवी शास्त्रीचा मोठा खुलासा

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.