कराची - कोरोना विषाणूच्या वाढत्या भीतीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुपर लीग स्पर्धा, प्ले ऑफ फेरीत थांबवण्याचा निर्णय घेतला. या लीगमध्ये इंग्लंडचा खेळाडू अॅलेक्स हेल्सला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा रंगली. यामुळे पीसीबीने सुपर लीमधील खेळाडू, सहायक कर्मचारी, सामनाधिकारी, प्रसारक आणि संघ मालक असे एकूण १२८ जणांची कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पीसीबीने आज (गुरुवार) जाहीर केला.
पीसीबीने कोरोना चाचणी झालेल्या १२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे जाहीर केले आहे. याविषयी पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी सांगितले की, 'पाकिस्तान सुपर लीग आणि पीसीबी यांच्या प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न होता. ही स्पर्धा संपेपर्यंत पाकिस्तानमध्येच थांबण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडू, सहायक कर्मचारी, प्रसारक आणि सामनाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आज त्याचा अहवाल आला असून सर्व निगेटिव्ह आहेत.'
-
PCB confirms all 128 COVID-19 tests are negativehttps://t.co/gug8c0OIQs pic.twitter.com/kqHvB9xM3P
— PCB Media (@TheRealPCBMedia) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PCB confirms all 128 COVID-19 tests are negativehttps://t.co/gug8c0OIQs pic.twitter.com/kqHvB9xM3P
— PCB Media (@TheRealPCBMedia) March 19, 2020PCB confirms all 128 COVID-19 tests are negativehttps://t.co/gug8c0OIQs pic.twitter.com/kqHvB9xM3P
— PCB Media (@TheRealPCBMedia) March 19, 2020
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे ८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले. तेव्हा पीसीबीने सुपर लीगचे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - 'पाक खेळाडूंची टीम इंडियात खेळण्याची लायकी नाही, धावा न केल्यास फलंदाजाला फुकटात राबवा'
हेही वाचा - अभिमानास्पद..! ICC डेव्हलपमेंट पॅनलमध्ये भारताच्या दोन महिला पंचांचा समावेश