ETV Bharat / sports

विजय हजारे करंडक : मुंबईने दिल्लीचा ७ गडी राखून उडवला धुव्वा, शॉचे शतक - vijay hazare trophy 2021 news

विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईने दिल्लीवर ७ गडी राखून विजय मिळवला.

prithwis century mumbai defeated delhi by 7-wickets
विजय हजारे करंडक : मुंबईने दिल्लीचा ७ गडी राखून उडवला धुव्वा, शॉचे शतक
author img

By

Published : Feb 21, 2021, 7:25 PM IST

जयपूर - सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याचे नाबाद (१०५) शतक आणि सूर्यकुमार यादवच्या (५०) अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्ली संघाचा विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एलिट ग्रुप-डीमध्ये सात गडी राखून पराभव केला.

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. हिम्मत सिंह याने १४५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीने ५० षटकात सात बाद २११ धावा धावफलकावर लावल्या. यात शिवांकने ५५ तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३९ धावांचे योगदान दिले.

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या २१२ धावांचे आव्हान मुंबईने पृथ्वी शॉचे शतक आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज पूर्ण केले. मुंबईने हा सामना ३१.५ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात जिंकला.

विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईचा हा पहिला सामना होता. मुंबईने हा सामना जिंकत चार गुणांची कमाई केली. पृथ्वीने ८९ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०५ धावांची खेळी साकारली. तर सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत ५० धावांची स्फोटक खेळी केली.

हेही वाचा - 'अहमदाबाद तयार रहा', चहलची पत्नी धनश्रीचा बॉलिंग आणि बॅटिंगच्या हावभावासह भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - मोटेरावरील खेळपट्टीबाबत पुजारा अनभिज्ञ, म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.