मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशभरात रविवारी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. त्याचबरोबर सध्याच्या कठीण परिस्थितीत जी लोकं अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत, त्यांचे कौतुक करण्यासाठी घराबाहेर येऊन टाळ्या वाजवणे किंवा घंटानाद करण्यास सांगितलं होतं. मोदींच्या या आवाहनाला चेन्नई सुपर किंग्ज संघानेही प्रतिसाद दिला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन महेंद्रसिंह धोनी, हरभजन सिंग आणि केदार जाधव यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात धोनी-हरभजन-केदार डान्स करत टाळ्या वाजवताना दिसून येत आहेत.
-
Let's show our appreciation to all those toiling night and day to keep us all alive, literally. Come let's #WhistlePoduAt5! #JantaCurfew 🦁💛 pic.twitter.com/2SlJYsLTrK
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Let's show our appreciation to all those toiling night and day to keep us all alive, literally. Come let's #WhistlePoduAt5! #JantaCurfew 🦁💛 pic.twitter.com/2SlJYsLTrK
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2020Let's show our appreciation to all those toiling night and day to keep us all alive, literally. Come let's #WhistlePoduAt5! #JantaCurfew 🦁💛 pic.twitter.com/2SlJYsLTrK
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2020
दरम्यान, कोरोनामुळे सध्या देशात गंभीर वातावरण आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. सर्व महत्वाच्या शहरांमध्ये टेस्ट लॅब वाढवण्याला सुरुवात झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यांनी महत्वाची शहरे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही ३४१ जणांना याची बाधा झाली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - कोरोना कनिकाला, चिंता आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला!
हेही वाचा -'अरे.. कोरोनाला गंभीर्याने घ्या, अन् खबरदारी बाळगा'