नवी दिल्ली - पाकिस्तान सुपर लीगच्या नवीन हंगामाला सुरुवात होताच एक नवा वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सामन्यादरम्यान एक व्यक्ती डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरताना दिसून आली आहे. या व्यक्तीचा फोन वापरतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा - विंडीजचा 'हा' अष्टपैलू क्रिकेटपटू आता पाकिस्तानचा नागरिक?
कराची किंग्स विरुद्ध पेशावर जालमी या संघात शुक्रवारी सामना पार पडला. या सामन्यादरम्यान एक व्यक्ती फोनवर बोलताना दिसून आली. आयसीसीच्या नियमानुसारही खेळाडू किंवा कोणताही संघसदस्य ड्रेसिंग रूम किंवा डगआऊटमध्ये मोबाइल फोन वापरू शकत नाही. परंतु त्यांना वॉकी टॉकीवर बोलण्याची परवानगी दिली आहे. मैदानावर वॉकी टॉकी वापरायला सामानाधिकारी, खेळाडू आणि पंच यांना परवानगी असते.
-
This is so wrong using mobile phone in dug out.... pic.twitter.com/hU3GLlTjXI
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) February 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This is so wrong using mobile phone in dug out.... pic.twitter.com/hU3GLlTjXI
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) February 21, 2020This is so wrong using mobile phone in dug out.... pic.twitter.com/hU3GLlTjXI
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) February 21, 2020
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही या घटनेला चूकीचे मानले आहे. डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरणे चुकीचे असल्याचे अख्तरने म्हटले आहे. या घटनेवर किंग्ज टीमचे मीडिया मॅनेजर फैजल मिर्झा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्यक्ती संघाचा व्यवस्थापक तारिक वासी होता. मात्र, नाणेफेकीदरम्यान देण्यात आलेल्या टीम शीटमध्ये नावेद रशीदचे संघ व्यवस्थापक म्हणून वर्णन केले गेले आहे.
-
Players are using mobile phn in the Dugout during a PSL game...
— bibhu (@satapathy190) February 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Khel se toh Paisa nhi mil raha... Fixing is obviously a better option...
But But But Best League in the world...#HBLPSL#Idiot_League ...😁😁😁 pic.twitter.com/Akhrj82lPc
">Players are using mobile phn in the Dugout during a PSL game...
— bibhu (@satapathy190) February 21, 2020
Khel se toh Paisa nhi mil raha... Fixing is obviously a better option...
But But But Best League in the world...#HBLPSL#Idiot_League ...😁😁😁 pic.twitter.com/Akhrj82lPcPlayers are using mobile phn in the Dugout during a PSL game...
— bibhu (@satapathy190) February 21, 2020
Khel se toh Paisa nhi mil raha... Fixing is obviously a better option...
But But But Best League in the world...#HBLPSL#Idiot_League ...😁😁😁 pic.twitter.com/Akhrj82lPc