मुंबई - जम्मू काश्मिरमधल्या पुलवामा येथे सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्ण देश तीव्र संताप व्यक्त करत आहे. यानंतर पूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचा विरोध करण्यात येतोय. हा हल्ला पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांकडून करण्यात आला आहे. हे स्पष्ट झाले आहे.
या हल्ल्याचे पडसाद भारत पाक क्रिकेट संबंधावरही मोठ्या प्रमाणात पडले आहेत. देशातील अनेक क्रिकेट संघटनांनी आपल्या क्रिकेट मैदानात लावण्यात आलेल्या पाक क्रिकेटर्सचे फोटो काढून टाकले आहेत. आयसीसीच्या आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही भारताने पाकविरुध्द क्रिकेट खेळू नये, अशी मागणी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून करण्यात आली आहे.
पंजाब आणि राजस्थान क्रिकेट संघटनेने आपल्या मौदानावरील पाक क्रिकेटर्सचे फोटो काढून टाकलेत. भारतातील क्रीडा चाहतेही पाकशी क्रिकेट संबंध पूर्णपणे तोडून टाकवेत अशी जोरदार मागणी करत आहेत. या पूर्ण प्रकरणात बीसीसीआय आणि भारत सरकार काय भुमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे.
Conclusion: