लाहोर - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) कर्णधार बाबर आझमला वर्षातील सर्वात उपयुक्त खेळाडू म्हणून निवडले आहे. २६ वर्षीय बाबरची मर्यादित षटकांसाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही निवड झाली आहे. बाबरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११०.५ आणि टी-२० क्रिकेटपटूमध्ये ५५.२च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत.
बाबरने यंदा ४ कसोटी सामने खेळले. यात त्याने ६७.६च्या सरासरीने ३३८ धावा केल्या आहेत. बाबरच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यासाठी कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला यंदाचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. रिझवानने ५ कसोटीत ३०२ धावा केल्या असून यष्टीरक्षण करताना १२ फलंदाजांना माघारी धाडले आहे.
तब्बल ११ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये दुसरे शतक ठोकणाऱ्या फवाद आलमला यंदाच्या सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्याने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १०२ धावांची खेळी केली.
हेही वाचा - उमेश यादवच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, ट्विट करून दिली माहिती