ETV Bharat / sports

गुड न्यूज..! क्रिकेटपटूची कोरोनावर मात

पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर याने कोरोनावर मात केली आहे. उमरला गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला घरामध्येच क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याच्यावर उपचारही सुरु होते. या उपचारांना आता त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे.

author img

By

Published : Jun 6, 2020, 6:45 AM IST

Pakistan's Taufeeq Umar recovers from coronavirus
गुड न्यूज..! क्रिकेटपटूची कोरोनावर मात

इस्लामाबाद - पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर याने कोरोनावर मात केली आहे. उमरला गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला घरामध्येच क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याच्यावर उपचारही सुरु होते. या उपचारांना आता त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर उमरने लोकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर उमरने सांगितले की, 'मे महिन्यामध्ये माझी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. यामध्ये मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर १४ दिवस मी घरामध्येच क्वारंटाइन होतो. मी अल्लाच्या आशिर्वादाने बरा झालो आहे. सध्याच्या घडीला मी पूर्णपणे फिट आहे. प्रत्येकाने आपली काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर कोरोना टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजनाही करायला हव्यात.'

३८ वर्षीय उमरने बांगलादेशविरुद्ध २००१ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. २०१४ साली न्यूझीलंडविरुद्ध त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्याने पदार्पणाच्या सामन्यात १६३ चेंडूंत १०४ धावांची खेळी केली होती. पण, त्यानंतर त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने २२ एकदिवसीय आणि ४४ कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. उमरने २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २३६ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.

हेही वाचा - युवराज सिंगवर गुन्हा दाखल, अटक होण्याची शक्यता

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये विराटचा विक्रम, 'अशी' कामगिरी करणारा जगातला पहिला क्रिकेटपटू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.