नवी दिल्ली - भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झानंतर अजून एका मुलीने पाकिस्तानी सासर निवडले आहे. हरियाणाची शामिया आरजू पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे.
हे लग्न दुबईच्या अॅटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये होणार आहे. हरियाणाची शामिया फ्लाईट इंजिनीयर आहे. या लग्नाची तारीख ऑगस्टच्या २० ठरवली आहे. हसन अलीचा जन्म पाकिस्तानतील पंजाब प्रांतात झाला होता.
शामियाच्या वडिलांनी सांगितले फाळणीच्या वेळी त्यांचे नातेवाईक पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यांच्या संपर्कात ते अजूनही आहे. पाकिस्तानचे माजी नेते आणि पाकिस्तान रेल्वे बोर्डाचे चेअरमन सरदार तुफैल हे शामियाच्या वडिलांचे आजोबा यांचे सख्खे भाऊ होते. फाळणीनंतर त्यांचे आजोबा भारतातच थांबले आणि सरदार पाकिस्तानात निघून गेले.